preloader

Blog

13

Dec

हस्त बहारातील ढगाळ वातावरण व धुके पडत असल्याने कळी गळ होउ नये यासाठी घ्यावयाची काळजी

सध्या ढगाळ वातावरण व सकाळचे धुके पडत असल्यामुळे डाळिंब पिकांला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. आज आपण त्यासंबंधी माहिती घेऊयात.

हस्त बहारमध्ये सध्या कुणी (फुलोरा) अवस्था सुरू आहे, या अवस्थेमध्ये ढगाळ वातावरण झाले तर कुणी जळते किंवा पानांवर डाग येतो व पाने पिवळे पडून गळतात. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश न भेटल्यामुळे फुलगळीचे प्रमाण वाढते. त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.

अन्नद्रव्य व्यवस्थापन (नत्र, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन, झिंक, फेरस ई...) काटेकोर करावे, फुलगळ होत असल्यास त्या मागील कारण शोधून काढा मगच योग्य ती फवारणी घ्यावी.

1. जर ढगाळ वातावरण असेल तर किंवा पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर ट्रायकॉन्टेनॉल (विपुल) 2-3 मिली/लिटर पाणी फवारावे.

2. तापमानात चढउतार होत असेल तर समुद्री शेवाळ (सी रीच, प्रिविड) 2मिली/लिटर पाणी फवारावे.

3. जास्त आद्रता असेल NAA तर 40मिली/200लिटर पाणी फवारावे.

हस्त बहारात कुणी अवस्थेत अल्टर्नेरिया, सर्कोस्पोरा, कोलेट्रोट्रीकम ई. बुरशीजन्य रोग ढगाळ वातावरणात व धुके पडत असल्याने जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतात.

उपाय योजना

1. नेटीओ – 0.6 ग्रॅम प्रती लिटर पाणी

2. फॉलीक्युर – 1 मिली प्रती लिटर पाणी

3. टिल्ट - 1 मिली प्रती लिटर पाणी

4. कुमान एल – 2 मिली प्रती लिटर पाणी

5. स्कोअर – 0.5 मिली प्रती लिटर पाणी

6. कवच, जटायु – 2 ग्रॅम प्रती लिटर पाणी


Tags:

19

Dec

जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात डाळिंब बहार धरण्याचा विचार करताय का ?

 

सप्टेंबर - ऑक्टोबर  मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पानगळ केल्या. तथापि परतीचा पाऊस भरपूर झाल्याने अनेक ठिकाणी पानगळ फेल गेल्या आहेत.

तसेच काही ठिकाणी चांगल्या पद्धतीत फुल निघूनही नैसर्गिक बदलामुळे  फुलगळ झालेली आहे व एका झाडावर 10-20 फळे सेट झालेली आहेत.

महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये  फेल गेलेले बाग जास्तीत जास्त शेतकरी हे जानेवारी - फेब्रुवारी मध्ये बाग धरतील, या सर्वांच्या मनात एकच शंका आहेत की सर्वच शेतकरी जानेवारी मध्ये पानगळ करणार तर मग नंतर एवढ्यांना बाजारभाव सापडतील का...?

आता बाजारभाव सापडतील अथवा नाही याबद्दल पानगळ पूर्वी विचार करणे संयुक्तीक  नाही. डाळिंब बागायतदारांनी तरी हा विचार करू नये. कारण शेवटी बाजारभाव हा त्यावेळी असलेली मागणी व होणारा पुरवठा यांवर अवलंबून असतात.

कदाचित त्यावेळी होणारा पुरवठा कमी व मागणी जास्त असल्यास भाव हे जास्तदेखील राहू शकतात. कारण उत्पादन घेत असताना  सर्वच ठिकाणी बागा 100% यशस्वी होतील असेही नाही, त्यामुळे भाववाढ ही या गोष्टींनी देखील प्रभावित होते. 

आता ज्यांचे बाग सेट झालेले आहेत त्यांनी आपल्या बागेची विशेष काळजी घ्यावी. यात खते व फवारणीचे विशेष नियोजन, फळ फुगवण व निरोगी बाग कशी राहील यांवर विशेष लक्ष द्यावे.

तसेच जे शेतकरी बाग जानेवारी - फेब्रुवारी मध्ये धरणार आहेत त्यांनी नियोजन खालील पद्धतीत करून मग पानगळ करावी.

1. डाळींबाचे मादी फूल निघण्यासाठी कमीत कमी 90-100  दिवसांचा 6 तासांचा सूर्यप्रकाश झाडांना मिळणे फार गरजेचे असते . तेंव्हा ते झाड चांगले अन्नद्रव्य बनवून मादी कळी देते.

2. पानगळ करण्याआधी 20 दिवस खालील अन्नद्रव्यांची फवारणी करावी -

अ. 00:52:34 – 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी

त्यानंतर 5 दिवसांनी

ब. 13:00:45 - 5 ग्रॅम + चिलेटेड  मायक्रोन्यूट्रीयंट - 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी

 

त्यानंतर 5 दिवसांनी

क.00:52:34 – 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी

त्यानंतर 5 दिवसांनी

ड.13:00:45 - 5 ग्रॅम + चिलेटेड  मायक्रोन्यूट्रीयंट - 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी

3. बुरशीनाशकांची फवारणी –

सध्याच्या वातावरणामध्ये सरकोस्पोरा बुरशी येण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी 8 – 10 दिवसांच्या अंतराने करावी.

उदा.

1.मॅन्कोझेब

2.कॉपर ऑक्सीक्लोराइड

3.प्रोपीनेब

4.कॅप्टन


Tags:

01

Jan

अ‍ॅग्री अ‍ॅकॅडेमीया आयोजित 3 दिवसीय शास्वत डाळिंब शेतीवरील प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..

आमच्या डाळींब प्रशिक्षण कार्यक्रमात उत्सुकता दाखविल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आमच्या आगामी डाळींब प्रशिक्षण कार्यक्रमाविषयीची माहिती लवकवच आपणांस कळवण्यात येईल.

हमारे अनार प्रशिक्षण कार्यक्रम में  रुची दिखाने से लिए हम आपके आभारी है। आपको अनार प्रशिक्षण के आगामी कार्यक्रमोंकी जानकारी जल्द ही सुचीत करेंगे।

We appreciate your interest in our Pomegranate Training Program. We will inform you about update and schedule of Pomegranate Training Program soon.

 


Tags: