सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पानगळ केल्या. तथापि परतीचा पाऊस भरपूर झाल्याने अनेक ठिकाणी पानगळ फेल गेल्या आहेत.
तसेच काही ठिकाणी चांगल्या पद्धतीत फुल निघूनही नैसर्गिक बदलामुळे फुलगळ झालेली आहे व एका झाडावर 10-20 फळे सेट झालेली आहेत.
महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये फेल गेलेले बाग जास्तीत जास्त शेतकरी हे जानेवारी - फेब्रुवारी मध्ये बाग धरतील, या सर्वांच्या मनात एकच शंका आहेत की सर्वच शेतकरी जानेवारी मध्ये पानगळ करणार तर मग नंतर एवढ्यांना बाजारभाव सापडतील का...?
आता बाजारभाव सापडतील अथवा नाही याबद्दल पानगळ पूर्वी विचार करणे संयुक्तीक नाही. डाळिंब बागायतदारांनी तरी हा विचार करू नये. कारण शेवटी बाजारभाव हा त्यावेळी असलेली मागणी व होणारा पुरवठा यांवर अवलंबून असतात.
कदाचित त्यावेळी होणारा पुरवठा कमी व मागणी जास्त असल्यास भाव हे जास्तदेखील राहू शकतात. कारण उत्पादन घेत असताना सर्वच ठिकाणी बागा 100% यशस्वी होतील असेही नाही, त्यामुळे भाववाढ ही या गोष्टींनी देखील प्रभावित होते.
आता ज्यांचे बाग सेट झालेले आहेत त्यांनी आपल्या बागेची विशेष काळजी घ्यावी. यात खते व फवारणीचे विशेष नियोजन, फळ फुगवण व निरोगी बाग कशी राहील यांवर विशेष लक्ष द्यावे.
तसेच जे शेतकरी बाग जानेवारी - फेब्रुवारी मध्ये धरणार आहेत त्यांनी नियोजन खालील पद्धतीत करून मग पानगळ करावी.
1. डाळींबाचे मादी फूल निघण्यासाठी कमीत कमी 90-100 दिवसांचा 6 तासांचा सूर्यप्रकाश झाडांना मिळणे फार गरजेचे असते . तेंव्हा ते झाड चांगले अन्नद्रव्य बनवून मादी कळी देते.
2. पानगळ करण्याआधी 20 दिवस खालील अन्नद्रव्यांची फवारणी करावी -
अ. 00:52:34 – 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी
त्यानंतर 5 दिवसांनी
ब. 13:00:45 - 5 ग्रॅम + चिलेटेड मायक्रोन्यूट्रीयंट - 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी
त्यानंतर 5 दिवसांनी
क.00:52:34 – 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी
त्यानंतर 5 दिवसांनी
ड.13:00:45 - 5 ग्रॅम + चिलेटेड मायक्रोन्यूट्रीयंट - 1 ग्रॅम प्रती लिटर पाणी
3. बुरशीनाशकांची फवारणी –
सध्याच्या वातावरणामध्ये सरकोस्पोरा बुरशी येण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी 8 – 10 दिवसांच्या अंतराने करावी.
उदा.
1.मॅन्कोझेब
2.कॉपर ऑक्सीक्लोराइड
3.प्रोपीनेब
4.कॅप्टन