सध्या ढगाळ वातावरण व सकाळचे धुके पडत असल्यामुळे डाळिंब पिकांला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. आज आपण त्यासंबंधी माहिती घेऊयात.
हस्त बहारमध्ये सध्या कुणी (फुलोरा) अवस्था सुरू आहे, या अवस्थेमध्ये ढगाळ वातावरण झाले तर कुणी जळते किंवा पानांवर डाग येतो व पाने पिवळे पडून गळतात. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश न भेटल्यामुळे फुलगळीचे प्रमाण वाढते. त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.
अन्नद्रव्य व्यवस्थापन (नत्र, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन, झिंक, फेरस ई...) काटेकोर करावे, फुलगळ होत असल्यास त्या मागील कारण शोधून काढा मगच योग्य ती फवारणी घ्यावी.
1. जर ढगाळ वातावरण असेल तर किंवा पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर ट्रायकॉन्टेनॉल (विपुल) 2-3 मिली/लिटर पाणी फवारावे.
2. तापमानात चढउतार होत असेल तर समुद्री शेवाळ (सी रीच, प्रिविड) 2मिली/लिटर पाणी फवारावे.
3. जास्त आद्रता असेल NAA तर 40मिली/200लिटर पाणी फवारावे.
हस्त बहारात कुणी अवस्थेत अल्टर्नेरिया, सर्कोस्पोरा, कोलेट्रोट्रीकम ई. बुरशीजन्य रोग ढगाळ वातावरणात व धुके पडत असल्याने जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतात.
उपाय योजना
1. नेटीओ – 0.6 ग्रॅम प्रती लिटर पाणी
2. फॉलीक्युर – 1 मिली प्रती लिटर पाणी
3. टिल्ट - 1 मिली प्रती लिटर पाणी
4. कुमान एल – 2 मिली प्रती लिटर पाणी
5. स्कोअर – 0.5 मिली प्रती लिटर पाणी
6. कवच, जटायु – 2 ग्रॅम प्रती लिटर पाणी