preloader

Blog

10

May

तेलकट डागाचे नियोजन

सध्या संपूर्ण महाराष्ट्रमध्ये उष्ण व दमट परिस्थिती तयार झालेली तसेच काही भागात पाऊस पडला आहे. ज्या डाळींब शेतकर्‍यांनी आंबे बहार धरलेला आहे त्यांची फळे सध्या हिरव्या-लाल रंगाच्या अवस्थेत आहेत अश्या बागेत उष्ण व दमट वातावरणामुळे तेलकट डागाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे किंवा झालेला आहे. आद्रता व उष्णता वाढल्यामुळे तेलकट डागाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी लगेचच एखादे अॅंटीबायोटिक व बुरशीनाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे. 

१. कॉपर ऑक्सिक्लोराइड 45 % + कासूगामाईसीन 5 % (कोनिका) – 1.5 ग्रॅम प्रती लिटर पाणी

२. कॉपर ऑक्सिक्लोराइड 2 ग्रॅम प्रती लिटर पाणी + स्ट्रेप्टोमाईसीन 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणी 

तसेच ज्या शेतकर्‍यांच्या बागा वरील सांगितल्याप्रमाणे अवस्थेत असतील व वातावरण उष्ण, आद्रतायुक्त व ढगाळ असेल तर खालील फवारणी 4 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून घ्याव्यात.

1. ट्रायकोडर्मा 5 मिली + सुडोमोनस फ्लूरेसेन्स 5 मिली प्रती लिटर पाणी.

2. बॅसिलस सबटिलस 5 मिली + सुडोमोनस फ्लूरेसेन्स 5 मिली प्रती लिटर पाणी.


तेलकट डागाचे नियोजन करताने अति फवारण्या करू नये कारण जास्त फवारणी केल्यामुळे बागेत आद्रता वाढून तेलकट डागाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तेलकट डाग चालू असेल तर कॅल्शियम नाईट्रेट, नाईट्रेट नाइट्रोजन युक्त खतांचा वापर शक्यतो टाळावा.


Tags: