preloader

Blog

01

Jan

कडाक्याच्या थंडीत डाळींब पिकाची घ्यावयाची काळजी

सध्या महाराष्ट्रात सर्वच भागात तापमान 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झाले आहे. डाळिंबाच्या विश्रांतीच्या काळाची अवस्था सोडून सगळ्याच अवस्थांमध्ये काहींना काही विपरीत परिणाम दिसू शकतील. जसे फुलगळ, फळे तडकने, फळांची वाढ थांबणे, परागीभवन करण्यासाठी मधमाशी बागेत न येणे इ.

आम्ही काही उपाययोजना सुचवीत आहोत त्या केल्यास थंडीमुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी होऊ शकते.

1) शक्य झाल्यास बागेला रात्री पाणी द्या. नियमित दिल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा पाणी जास्त द्या.

2) पाण्यात विरघळणारे सल्फर (fertis) 10 ग्राम प्रती झाड या प्रमाणे ड्रीप मधून द्यावे.

3) भोतावर गव्हाचे भुस किंवा बाजरीच्या बनग्या सोडून इतर कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करावे जेणेकरून जमिनीचे तापमान जास्त कमी होणार नाही. मुळी कार्यक्षम राहण्यासाठी मदत होईल.

4) कोणतीही फवारणी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घ्यावी.

5) फुलगळ होऊ नये आणि फळे तडकू नये म्हणून खालील 2 फवारण्या कराव्यात,

* कॅल्शिअम नाईट्रेट ग्राम किंवा स्टॉप ईट 5 मिली + बोरॉन 1 ग्रॅम.

* सीलामोल 1 मिली किंवा ग्रीन सिल 2.5 ग्रॅम किंवा सिलिक्झोल 2 मिली

6) जर तापमान 6 डिग्री  सेल्सिअस पेक्षा कमी झाले तर पहाटे 2 वाजता शेकोटी पेटून धूर करावा.

7) जर फळांना लाल रंग आला असेल आणि काही फळांना बुरशीजन्य रोगामुळे डाग आलेले असतील तर अशी फळे काढून घ्यावीत कारण ते फळे तडकाण्याची शक्यता जास्त असते.

8) ज्या बागा फुलोऱ्यात असतील व बागेच्या आजूबाजूला मधमाशी आहे परंतु बागेत येत नाही यावेळी ऑर्चिड  हनी 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी


Tags: