डाळिंब पीक उत्तम कृषी पद्धती
04 January 2022

डाळिंब पीक उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण कार्यक्रम* पारगाव सूद्रिक येथे पार पडला.
सहकार व पणन विभाग,  महाराष्ट्र शासन,
आशियाई विकास बँक अर्थासहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क प्रकल्प अंतर्गत फार्म डीएसएस ॲग्रीटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, मोफत *डाळिंब पीक उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण कार्यक्रम* पारगाव सूद्रिक येथे पार पडला.
या कार्यक्रमाला 
*मा. श्री दिपक शिंदे*
मा.प्रकल्प संचालक मॅग्नेट प्रकल्प, तथा सरव्यवस्थापक, म. रा. कृ. प. मं. पुणे
*मा. श्री चंद्रशेखर बारी*
विभागीय उपप्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प तथा उप सरव्यवस्थापक, नाशिक
*मा. श्री नितीन पाटील*
उप प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प, पुणे
यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणामध्ये 250 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला व प्रमुख मार्गदर्शक म्हणून  *मा. डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर* यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात गोरे सरांनी डाळिंब पिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी रोग, कीड, पाणी, अन्नद्रव्य आणि तण व्यवस्थापन याविषयांसोबतच फळ काढणी पश्चात व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी *गीताई फार्मर प्रोड्युसर कंपनी* चे सहकार्य लाभले.