फार्म डीएसएस का? सर्व शेती समुदायाच्या गरजांसाठी वन स्टॉप सोल्युशन

  • तुमच्या क्षेत्रात आघाडी घ्या

    फार्म डीएसएस मध्ये, आम्ही एक चपळ कार्यसंघ आहोत ज्यात कृषीशास्त्रीय पद्धती, निविष्ठा आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींसह विविध आघाड्यांवर शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अगोदर काम करतो. आम्ही हे उपाय परस्पर संवादी माध्यम स्वरूपात देत आहोत जे शिक्षण आणि शिकण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.


    शिक्षणाचे महत्त्व आजही शेतीमध्ये सर्वाधिक दुर्लक्षित क्षेत्र आहे आणि अजूनही शेतकऱ्यांचा मोठा गट कोणत्याही योग्य तांत्रिक ज्ञानाशिवाय शेती करत आहे.


    वास्तविक शेती हे एक शास्त्र आहे ज्यासाठी योग्य ज्ञान आणि शिक्षण आवश्यक आहे.


    कोणत्याही पिकाच्या शास्त्राचे योग्य ज्ञान असल्यास शेतकरी उत्पादनाचा दर्जा, उत्पादन आणि नफा या बाबतीत उत्कृष्ट परिणाम मिळवू शकतात.


    विविध अनिश्चितता आणि आव्हानांमुळे, सुशिक्षित तरुण शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून निवड करण्याकडे झुकत नाहीत.

  • आयटी क्षेत्र आणि मीडियावर आधारित कृषी विस्तार उपक्रम

    फार्म डीएसएस मोबाइल अॅप:


    भारतातील वैविध्यपूर्ण हवामान आणि भौगोलिक परिस्थितीत शेतकर्‍यांसाठी विशिष्ट कृषी उपाय वितरीत करण्यात अधिक अचूकता आणि सत्यता आणण्यासाठी, फार्म डीएसएस ने 2019 मध्ये लॉन्च केलेल्या फार्म डीएसएस मोबाईल ऍप्लिकेशनचे अनोखे समाधान आणले आहे. फार्म डीएसएस ऍप जोरदार वापरत आहे. शेतकऱ्याने अॅपवर शेतीची नोंदणी करताना विविध (व्हेरिएबल) पॅरामीटर्सवर इनपुट दिल्यावर शेतीसाठी विशिष्ट सरावाचे अचूक पॅकेज मिळवण्यासाठी बॅकएंडवर जटिल अल्गोरिदम. फार्म डीएसएस मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये विविध वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि 100 शेतकऱ्यांच्या विविध यशोगाथा आहेत.


     ऍग्री अॅकॅडेमिया मोबाइल अॅप:


    कृषी शिक्षणासाठी वन स्टॉप सोल्यूशन प्रदान करण्यासाठी आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी एक अनोखा शिक्षण मंच आहे ज्याला आम्ही म्हणतो “फार्मर्स डिजिटल स्कूल” ऍग्री अॅकॅडेमिया मोबाईल ऍप्लिकेशन फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले आहे, विविध सत्यापित कृषी तज्ञांसाठी विविध कृषी विषयांवर थेट आणि रेकॉर्ड केलेले अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी खुले व्यासपीठ आहे. आणि विविध पिके. फार्म डीएसएस कृषी अकादमीवरील विविध थेट आणि रेकॉर्ड केलेले अभ्यासक्रम देखील दाखवत आहे. सध्या 3 भाषांमध्ये उपलब्ध, Agri Academia App ज्याला शेतकऱ्यांनी फार कमी कालावधीत शिकण्यासाठी जबरदस्त स्वीकृती मिळवून दिली आहे. 20 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अॅप लॉन्च केल्याच्या 6 महिन्यांत 40 हजारांहून अधिक कोर्सेसचे सदस्यत्व घेतले आहे.

  • ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम

    कोविडला प्रतिसाद म्हणून, फार्म डीएसएस अॅग्रीटेक शेतकर्‍यांसाठी थेट ऑनलाइन प्रशिक्षणांचे योजणा घेऊन आले. एक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे आणि लाइव्ह मोडमध्ये झूम ऍप्लिकेशनद्वारे हिंदी आणि मराठीमध्ये वितरित केला जातो. खाली काही लोकप्रिय कार्यक्रम आहेत:


    1. 50 तास डाळिंब मास्टरी


    2. 15 तास डाळिंब बहार व्यवस्थापन


    3. 15 तास वनस्पती पोषण व्यवस्थापन


    4. 10 तास सिंचन आणि पोषण व्यवस्थापन


    5. 10 तास पीक संरक्षण प्रभुत्व


    आतापर्यंत 24 बॅचमध्ये 7000 हून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत.

  • कृषी सल्लागारांसाठी

    कृषी तज्ज्ञ म्हणून तुमच्या यशाची गुरुकिल्ली ज्ञान आणि प्राविण्य आहे. अधिक जाणून घेणे म्हणजे तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या क्लायंटसाठी अतिरिक्त मूल्य आणू शकता. फार्म डीएसएस चे ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन, तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेले व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञान मिळवू शकता.

  • उपक्रमांसाठी

    तुम्ही ज्या संस्थेशी संबंधित आहात त्यानुसार, तुम्हाला वेगवेगळ्या आवश्यकता असू शकतात - कार्यशाळा, एजी तंत्रज्ञानाचे मूल्यांकन, विस्तार सेवा, मोठ्या प्रमाणावर कृषी प्रकल्पांसाठी व्यावसायिक समर्थन इ. फार्म डीएसएस तुम्हाला सानुकूलित व्यावसायिक उपाय प्रदान करेल. आमच्याशी संपर्क साधा.

  • उत्पादकांसाठी

    उत्पादकांच्या माहिती आणि ज्ञानाच्या गरजांसाठी फार्म डीएसएस वर नॉलेज बँक. आमचा अॅग्री अॅकॅडेमिया अॅप्लिकेशन परस्परसंवादी बहुभाषिक शिक्षण मंच म्हणून काम करतो. अॅग्री अॅकॅडेमिया अॅपवर वापरकर्ते लाइव्ह आणि व्हिडिओ कोर्सेस ऍक्सेस करू शकतात. शेतकरी फार्म डीएसएस मोबाईल ऍप्लिकेशनवर पीक सल्ला आणि सरावाचे अचूक पॅकेज देखील मिळवू शकतात.

Blog & Event

  • उत्तमउत्पन्न
  • उच्च कार्यक्षमता
  • निःपक्षपाती सल्ला
  • आपले नियंत्रण

रणरणत्या उन्हामध्ये मार्गक्रमण करत असताना  एखाद्या वाटसरुला प्रचंड तहान लागावी.  त्याला समोर हिरवा गार वटवृक्ष ( वडाचे झाड) दिसावा. त्याचा आसरा घेत असतानाच झाडाखाली ठेवलेल्या थंडगार पाण्याच्या डेऱ्यामधील पाणी पिऊन त्याने तृप्त व्हावे.
अगदी तशीच गत आम्हा सर्व शेतकऱ्यांची झाली आहे. आज प्रत्येक शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके, सेंद्रिय खत पुरवणाऱ्या विविध कंपन्या, मजुरीवर होणारा खर्च  या सर्वांमुळे  पिचून गेला आहे.आणि अशातच त्याला FARM DSS रुपी वट वृक्ष दिसावा .आणि गोरे सरांनी अनंत कोटी जिवाणूंचा ज्ञानप्रसाद वटवृक्षाच्या माध्यमातून द्यावा. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील शेतकरी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून संपन्न व्हावा. अशी गोरे सरांची इच्छा आहे.
तुझं आहे तुझ्यापाशी या उक्तीप्रमाणे बांधवानो बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ आहेत, परंतु केमिकल फार्मिंग च्या नादी लागून आपण आपल्यावरचाच विश्वास उडवला आहे.
 गोरे सरांनी सध्या माती समृद्ध करण्याचे जे अभियान राबवले आहे. त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ या.
      सरांना माझी अशी एक विनंती आहे की, माती समृद्ध करण्याबरोबरच जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक यावर पण संशोधन  करावे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये कशी शेती पिकवावी, याबद्दल मार्गदर्शन करावे. FARM DSS च्या माध्यमातून जोडले गेलेले शेतकरी नक्कीच समृद्ध होतील यात शंका नाही.
.       संताजी सर्जेराव परबत. 

संताजी सर्जेराव परबत शेतकरी

मी व्यवसायाने अभियंता असून 2006 पासून डाळिंब शेती करत आहे. एवढे ट्रेनिंग करून आणि एवढा अनुभव असून ही सरांचे एकही वेबिनार सोडत नाही आणि वर्षांत किमान 2 ट्रेनिंग करतोच करतो, कारण त्याचे फायदे अगणित आहेत. गोरे सरांचे ट्रेनिंग करण्यापूर्वीची शेती आणि आताची शेती जमीन अस्मानाचा फरक आहे. एकही हंगाम आता फेल जात नाही. पूर्वीचा परावलंबीपणा, धाकधूक, भीती, दडपण केव्हाच संपलेलं आहे. खूप मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि निर्णय घेताना पूर्वी सारख्या फारश्या चुका होत नाहीत. खर्च निम्म्यापेक्षा जास्त कमी होऊन उत्पादनांची गुणवत्ता फार मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. नफ्याचे प्रमाण वाढलेले आहे. हा सर्व फायदा म्हणजे एक न संपणारा अमूल्य ठेवा आहे ज्याची किंमत होऊच शकत नाही आणि या फायद्याचे वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.

गोरे सरांसारखा गुरु न भूतो न भविष्यती. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. खरोखर शेती क्षेत्रामध्ये एवढे अष्टपैलू (Versatile, All round) व्यक्तिमत्व कोठेही नाही.

हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कृषी विद्यापीठा बद्दल न बोललेच बरे. कोणत्याही तज्ञास फक्त एकाच विषयाचे ज्ञान असते आणि तेही बहुधा थेअरीच. ते सुद्धा घेण्यासाठी भरमसाठ रक्कम मोजावी लागते, जी सर्व सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर असते आणि अशा ज्ञानाचा प्रत्यक्ष शेती मध्ये फारसा फायदा ही नसतो हे अनुभवाने लक्षात येते.

शेतीचे सर्व विषय आणि तेही प्रॅक्टिकल्स सह, सर्व ट्रायल सह, एवढ्या प्रदीर्घ अनुभवा सह, नाम मात्र दरामध्ये, सर्वाना समजेल एवढ्या सोप्या भाषेत, अशी शिक्षण व्यवस्था खरोखरच जगाच्या पाठीवर कोठे ही नसावी... याचा लाभ न घेणारा खरोखर पामरच...

मला वाटते भविष्यात फार मोठा आणि सशक्त समुह सर तयार करण्यात निश्चित यशस्वी होतील  आणि सध्याची शेती क्षेत्राची अवस्था पाहता त्याची नितांत आवश्यकता सुद्धा आहे. गोरे सरांसारखे निस्वार्थी, निष्कपट ऋषी तुल्य व्यक्तिमत्वच फक्त अशी मोठी जबाबदारी पेलू शकतात. आपण सर्वांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणे, भर भरून सर्व उपक्रमात पाठींबा देणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्यच आहे किंबहुना पुण्याचे काम आहे.. मला वाटते यातच शेतकरी वर्गाचे दीर्घकालीन हित आहे .

एस. जी. शेख शेतकरी

मी आज पर्यंत गोरे सरांचे पाच ट्रेनिंग केले आहेत.

आताचे प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी हे माझे सहावे ट्रेनिंग आहे, सर्वांनी प्रत्येक ट्रेनिंग करावे, वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये वेगवेगळी माहिती मिळते.

गोरे सर म्हणजे एक भूमातेचे दैवत आहे.

धन्यवाद.

राघू सावळेराम जाधव शेतकरी

आपण आज केलेल्या अनमोल मार्गदर्शनाचा सर्व शेतकर्यांना फायदा होईल आजचं वेबीनार म्हणजे पाण्यात बुडणाऱ्याला काठीचा आधार आपल्या वैयक्तीक जीवनात आपण शेतकऱ्यांसाठी वाहुन घेतलं, घरावर तुळशित्र ठेवून आपण आपलं काम करतात इतका मोठा अवलिया या विश्वात शेतकऱ्यासाठी कोणीही नाही. सगळी मतलबी दुनिया आहे मग तो दुकानदार असो. उलट शेतकऱ्याचं नुकसान झाल्यावर सर्व सजीव सृष्टीला फायदा होतो असं मला वाटतं. आजचा शेतकरी मोठ्या हिमतीनं उभा राहतो पण नैसर्गिक आपत्ती काही जमु देत नाही, पण आपण ईश्वर रूपी देव शेतकऱ्यांना लाभले आणि सकटात योग्य वेळी आपण शेतकऱ्यांना योग्य अनमोल सल्ला दिला, तहान, भूक वेळ सर्व मॅनेजमेंट करून तुम्ही आम्हाला भक्कम आधार उमेद दिली.

धन्यवाद...

किशोर वाघ शेतकरी

हा कोर्स माझ्या डाळिंब शेतीला वरदान ठरला आहे. मा. गोरे सरांनी सांगितलेली माहिती मी शांत मनाने किती तरी वेळेस ऐकली व अजुनही मला वेळ भेटल्यावर मी सरांचे व्हिडिओ कोर्स Agri Academia या मोबाइल अॅप पाहतो व त्या पध्दतीने डाळिंब शेतीत आता काम करतो. मला माझ्या डाळिंब शेती खूप बदल दिसून आलेला आहे. मागील वर्षी माझ्या बागेची पूर्णपणे फुलगळ झाली होती, त्या वेळी मला सचिन चिंधे साहेब भेटले व त्या नी मला सांगितले की आपण बी. टी. गोरे सरांनी सांगितलेल्या पध्दतीने शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करून पहा, मग त्या पध्दतीने मी बागेत काम करायला सुरुवात केली एका महिन्यातच बागेला पुन्हा कळी निघाली. त्या वर्षी मला चारशे झाडात सहा टनांपर्यंत माल निघाला शंभर रुपये दर भेटला. दोन वर्षे झाली आहे तसे संराचे मार्गदर्शन घेत आहे व इथून पुढेही घेणार आहे. धन्यवाद

योगेश शिंदे शेतकरी

माझे मुळ गाव मु. वाल्हे - आडाचीवाडी, ता. पुरंदर जि. पुणे आहे. माझी चार एकर शेती असून, अंजीर, पेरू, शिताफळ ही फळबाग लागवड केली आहे. सध्या ती खंडाने दिली आहे. मी दोन वर्षांत सेवानिवृत्त होत आहे. मला सेंद्रिय शेती करण्याची आवड आहे. तीन वर्षांपूर्वी पासून मी YouTube वर सर्च करून त्या विषयाचे थोडेफार ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपले BTGore चॅनल जॉइन केल्यापासून खुपचं नवीन व उपयुक्त माहिती मिळते. आपण लेक्चर मध्ये सांगितले प्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी अंमलबजावणी केली तर, शेतीत सेंद्रिय उत्क्रांती होऊन शेतकरी आत्महत्या बंद होऊ शकतात. विषमुक्त मालाची निर्मिती होऊन आजार कमी होऊ शकतात. शेतीचे आरोग्य सुधारते. उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळू शकतो. आपल्या कडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून भविष्यात सेंद्रिय शेती करण्याची योजना आहे.

दामोदर आनंदराव पवार फौजदार, मुंबई पोलिस

पावसाळी हंगाम आणि डाळिंब रोग व्यवस्थापन याविषयी आपले गुरु आदरणीय गोरे सरांनी दिलेले लेक्चर अत्यंत उपयुक्त आणि डाळिंब उत्पादक शेतकन्यांसाठी लाख मोलाचे आहे. सरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त आपल्या बागेत योग्य वेळी वापर करून रोगाचे व्यवस्थापन करावे, डागमुक्त व गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन करून आर्थिक उन्नती करून घ्यावी व वर्षातून एक वेळा कोर्स नक्की करावा.

डॉ. नाना केरू सातपुते शेतकरी

 दंडवत प्रणाम  मी तुमचा  एक शिष्य. गेल्या 2 वर्षांपासून आपल्या सोबत जोडल्या गेलो आहे. मी औषध दुकानात काम करणारा  एक साधारण मुलगा,  सर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, आपल्या मुखातून निघालेला शब्द आज मी माझ्या शेतकरी राजापर्यंत पोहचवला आणि गेल्या 3 महिन्यापासून च्या  निरंतर बदलणाऱ्या  वातावरणामध्ये देखील आज मी कित्येक शेतकऱ्याच्या बागा तेल्याग्रस्त होण्या पासून थांबवल्या,  सर याच सर्व श्रेय मी तुमच्या चरणी अर्पण करतो. आपल्या  संपर्कात आलेल्या प्रत्येक  व्यक्तीमध्ये नवीन परिवर्तन दिसून येत, फक्त  शेतापर्यंत मर्यादित नसून त्याच्या संपूर्ण जीवनात परिवर्तन घडून येत. खरच तुमच्या हस्ते जे मोलाचे सहकार्य शेतकऱ्यांसाठी घडत आहे यातून धरती मातेची  देखील सेवा घडत आहे. आणि यापेक्षा चांगलं  कर्म काय असू शकणार  काळ्या आईला पुन्हा एकदा सुपीक करण्याचं मोलाचं कार्य आपल्याकडून घडत आहे.  येत्या काळातही मला व सर्व शेतकरी बांधवांना आपला संग लाभावा हीच ईच्छा. आपल्या चरणी वारंवार दंडवत प्रणाम करतो.
 ( Save the mother earth )
 

प्रदीप पाटील शेतकरी

काल साटणा येथे आपला कार्यक्रम खूप छान झाला. मी सातमाने येथे पण तुमचा कार्यक्रमास होतो.तुमची शेतीची पद्धत मला खूप सोपी वाटली. मी रासायनिक 50% कमी केले , व तण नाशक बंद केले त्यामुळे माझ्या बागेत कमी प्रमाणात तेल्या होता. माझा प्लॉट जानेवारीचा होता. माझा माल हरवेस्टिंग झाला.सर माझे शिक्षण कमी आहे पण माझी मुलगी कुमारी श्वेता सुरेश नरोटे BSC Agri केली आहे ती तुमचे ऑनलाइन क्लास करते व  मला मार्गदर्शन करते. ती तुम्हाला गुरु मानते . ती कायम तुमचे कौतुक करत असते , सर असेच सहकार्य आम्हा शेतकर्‍यांना राहू द्या ही विनंती. 

मी एक अत्यल्प भू धारक शेतकरी आहे. 

सुरेश नरोटे शेतकरी

मी माझ्या डाळींबाचे श्रेय  गोरे सर अपणास देते , आपल्या ऑनलाइन ट्रेनिंगमुळे मी हे डाळिंब काढू शकले, डाळींबाचे  पूर्ण नियोजन मी स्वत :  केले आहे आणि पुढील वर्षी उत्तम दर्जाचे डाळिंब काढण्याचा प्रयत्न करेल , सरांनी असेच मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .


सरांचे मनापासून धन्यवाद ,

ज्योती किशोर देवरे .

ज्योती देवरे शेतकरी