दखल कार्याची.....
02 January 2023

दखल कार्याची.....

आज दिनांक रोजी 02 जून 2023, आशियाई विकास बँक, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) आणि ग्रँट थोर्नटन यांच्या मान्यवरांची फार्म डीएसएस ला सदिच्छ भेट.

या भेटीदरम्यान, सर्व आदरणीय मान्यवरांनी देशी गीर गायींच्या सुधारित गोठ्याला भेट दिली व तेथे चारा व्यवस्थापन तसेच दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व शेणाच्या व्यवस्थापणाविषयी माहिती जाणून घेतली ज्यामध्ये शेणाद्वारे गोबर गॅस निर्मिती कशी केली जाते याचे मार्गदर्शन माननीय डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर यांनी केले. 
यानंतर शाश्वत डाळिंब  पिकाच्या उत्पादनासंदर्भात माहिती देताना एक खोड पद्धत, पाणी व्यवस्थापणामध्ये डबल लॅटरल चे महत्व, बेड पद्धती, सनबर्न पासून बचावासाठी क्रॉप कवर, फ्रूट बॅग, इंग्रजी वर्तमानपत्राची प्रात्यक्षिके तसेच कॅनोपी व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकांची माहिती दिली. 
यानंतर स्लरी यूनिट, गायत्री संजीवनी खत, तसेच पाणी व्यवस्थापणासाठी ऑटोमेशन यूनिटची पाहणी मान्यवरांनी केली. तद्नंतर पाणी संवर्धन करून नैसर्गिक आंबा शेती कशी केली जाते याबद्दल माहिती दिली. 
या भेटीदरम्यान, फार्म डीएसएस परिवार शेतकर्‍यांच्या हितासाठी कशा पद्धतीने कार्यरत असते याची संपूर्ण माहिती उपस्थित मान्यवरांना डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सरांनी दिली.

उपस्थित मान्यवर, 

Asian Development Bank Dignitaries
1. Mr. Masahiro Nishimura, Principal Rural Development Specialist, SAER/Mission Leader, ADB
2. Mrs. Rika Idei, Transport Specialist, ADB
3. Mrs. Princess O. Lubag, Associate Operations Officer, ADB
4. Mr. Brando M. Angeles, Associate Environment Officer, ADB
5. Mr. Sunil Choukiker, Staff Consultant (Environment), ADB
6. Mr. Krishan S. Rautela,Associate Project Officer (Infrastructure), INRM, ADB
7. Mr. Raghavendra R. Naduvinamani, Project Analyst, INRM, ADB
8. Mr. Girish Mahajan, Senior Environment Officer, ADB
9. Mr. Sumeet Rathore, Associate Safeguards Officer, INRM, ADB
10. Mr. Govind B. Desai, Social Development Officer (Gender), ADB

MAGNET
11. Mr. Nitin Patil, Dy. Project Director, MAGNET
12. Mr. Deepak Salunkhe, Project Officer, MAGNET
13. Mr. Vijay Jagtap, Project Officer, MAGNET

GRANT THORNTON
14. Mr. Chetan Bhakkad, Deputy Team Leader, MAGNET and Partner, Grant Thornton
15. Dr. Indu Ram Chandra, Social Specialist, MAGNET
16. Mr. Ajinkya Atkare, Manager, Grant Thornton
17. Miss Pranjali Pethkar, Consultant, Grant Thornton